Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागेचा वाद जीवावर बेतला! महिलेची चाकू भोकसून हत्या

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (08:35 IST)
नागपूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजाऱ्यांमध्ये जागेवरून वाद पेटला आणि हा जागेचा वाद जीवावर बेतला आहे. घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच महिलेची चाकू भोकसून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नागपूरच्या रामबाग परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  आरती निकोलस असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार रामबाग परिसरात घडला आहे. या भागात आरती निकोलस आणि बादल कुमरे हे एकमेकांच्या शेजारी राहत होते. बादलच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी त्याने आपल्या राहण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून एक झोपडी शेजारील जागेचे अतिक्रमणकरीत बांधली होती.
 
मात्र, त्या झोपडी मध्ये आरतीला दुकान लावायचे होते, त्यामुळे तिने त्या झोपडीची मागणी केली आणि बादलला ती जागा सोडण्याचा हट्ट केला. मात्र बादल ती जागा सोडण्यास तयार नव्हता. या कारणावरून त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद सकाळच्या सुमारास झाला होता, नंतर त्यांच्यात मध्यस्ती झाली. सर्वांना वाटले प्रकरण निवळले पण, त्यानंतर बादल अचानकपणे आला त्याने आरती वर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली, यात आरती गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी आरतीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाची चौकशी करत आरोपी बदल कुमरे याला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती इमामवाडाचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघमारे यांनी दिली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

गडचिरोली मध्ये दोन नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफसमोर शस्त्र ठेऊन आत्मसमर्पण केले

LIVE: महाराष्ट्र विधानसभेत जेल सुधारणा विधेयक मंजूर

संजय राऊतांच्या घरी दोन जणांनी केली रेकी, माझ्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहे म्हणाले शिवसेना युबीटी नेते

महाराष्ट्र विधानसभेने राज्याच्या तुरुंग व्यवस्थेत सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले

विधानपरिषदेत विरोधक गोंधळ घालत म्हणाले- भाजपला आली सत्तेची मस्ती

पुढील लेख
Show comments