Festival Posters

नाशिक :तहसीलदारांच्या रजा आंदोलनाने काम ठप्प

Webdunia
बुधवार, 6 डिसेंबर 2023 (20:42 IST)
राज्यातील नायब तहसीलदारांना ग्रेड पे संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, यासाठी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी मंगळवारी (ता. ५) सामूहिक रजा आंदोलन केले.
 
त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २८ तारखेपासून ‘बेमुदत काम बंद’चा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदारांनी नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना नाशिक विभागातर्फे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले.
 
त्यात राज्यातील नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग-२ यांची ४८ हजार रुपये ग्रेड पे लागू करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या एप्रिलमध्ये दिले. मात्र, शासन स्तरावर त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
 
शासनाने ग्रेड पेची मागणी तातडीने पूर्ण करावी, अन्यथा येत्या १८ तारखेला शासनाला स्मरणपत्र देण्यासाठी दोन तास धरणे आंदोलन, तसेच २८ तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पंकज पवार, शरद घोरपडे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींवर केलं 'वशीकरण', आम्ही त्यांना वैदिक मंत्रांनी मुक्त केले, परमहंस आचार्यांचा खळबळजनक दावा!

धुक्यामुळे ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, चार जणांचा मृत्यू

कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

पोलिसांच्या वेशात दोन पुरूषांनी केनियातील एका महिलेकडून 66 लाख रुपये लुटले; आरोपींना अटक

कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी

पुढील लेख
Show comments