Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : टोमॅटो दर 15 दिवसांच्या तुलनेत 2 हजारांनी कोसळले

Webdunia
सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (20:15 IST)
नाशिक :काही दिवसापूर्वी तेजीत असलेले टोमॅटो दर आता आवक वाढल्याने भाव खाली आले आहेत. अडीच हजार रुपयांना विक्री झालेली क्रेट आता सरासरी पाचशे रुपयांना विकावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. याआधी जुलै महिन्यात टोमॅटोचे भाव अडीच हजार रुपये क्रेटपर्यंत पोहोचले होते. आधी टप्प्याटप्प्याने आवक वाढत गेले तसे दर घसरत चालले आहेत. बेंगळुरूमध्ये स्थानिक टोमॅटो बाजारात दाखल झाल्याने महाराष्ट्राकडून मागणी कमी झाली आहे. 
 
एका दिवसात साधारणत: टोमॅटोची आवक 40 हजार क्रेट दरम्यान होते. त्याला प्रतिक्रेट 500 ते 550 रुपये दर मिळाला. हाच दर कायम राहिला तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरुन निघेल. यापेक्षा कमी झाले तर मात्र आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 
 
दोन आठवड्यांपूर्वी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत अवघी अडीच हजार क्रेट आवक होती. त्यावेळी प्रति क्रेट कमीत कमी 200 व जास्तीत जास्त 2300 रुपये दर होता. आता दिवसाला 40 हजार क्रेटपर्यंत आवक होते. तसेच जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही टोमॅटोची आवक वाढल्याने दरात प्रत्येक दिवशी घसरण होताना दिसून येते.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुण्यात चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

वृद्ध रुग्णाचा लाखोंचा माल चोरल्याप्रकरणी परिचारिकेवर गुन्हा दाखल

World Students Day 2024: जागतिक विद्यार्थी दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जाणून घ्या

APJ Abdul Kalam Birthday : मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन परिचय

शिंदे सरकारने ऑलिम्पिक कांस्य विजेता स्वप्नील कुसाळे यांचा गौरव केला

पुढील लेख
Show comments