Festival Posters

मुंबई विद्यापीठाने फी दरवाढ मागे घ्यावी

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:44 IST)

मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा व फेरपरीक्षा शुल्क या सत्रापासून सुमारे दुपटीने वाढवले आहे. याबाबत प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांची आज मुंबई प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी भेट घेऊन फी दरवाढ मागे घेण्याचा इशारा दिला. मुंबई विद्यापीठाचे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा शुल्क ६५०/- रुपयांवरून १५६०/- रुपये केले आहे. पुनर्मूल्यांकनाचा निकाल कधीपर्यंत जाहीर होणार याबाबत शाश्वती नसल्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना फेरपरीक्षांचे अर्ज भरणे अनिवार्य झालेले आहे. एकीकडे पुनर्मूल्यांकनाचे २५० रुपये आणि छायांकित प्रतीचे शुल्क ५० रुपये या नव्या शुल्क नियमानुसार ३०० रुपये बचत झाली असली तरी फेरपरीक्षाच्या शुल्कामध्ये एकदम ९०० रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे विद्यार्थांना जवळपास ६०० रुपयांचा फटका सोसावा लागणार आहे याचा अर्थ विद्यापीठाने विद्यार्थांची फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया अमोल मातेले यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: अशोक खरात प्रकरणातील प्रमुख साक्षीदार जितेंद्र शेळके यांचे रस्ते अपघातात निधन

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये १०% भाडेवाढीमुळे एसटी बसचा प्रवास महाग झाला

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी अनिवार्य, नियमांचे उल्लंघन केल्यास मान्यता रद्द होणार

इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळले, ८ जणांचा मृत्यू

टायर फुटल्याने कारची बसला धडक, पाच मुलांसह ९ जण जळून खाक

पुढील लेख
Show comments