Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निलेश राणे यांची शिवसेना खासदारावर जहरी टीका, म्हणाले कुडाळच्या जंगलात

Webdunia
सोमवार, 9 डिसेंबर 2019 (17:00 IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर जहरी टीका केली असून,  आहे. यावेळी निलेश राणे यांनी टीकेचे पातली घसरली आहे.  निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा फोटो शेअर करत त्यावर 'डुक्कर पकडला ' असा उल्लेख केला आहे.
 
कोकणात राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यातून मग दोघेही एकमेकांवर जोरदार  टीका करतात. आता या टीकेची पातळी घसरताना दिसत आहे. एकमेकांवर आरे-तुरे करून टीका करणं इथंपासून ते आता प्राण्यांची उपमा देणं इथंपर्यंत हे राजकारण सुरु झाले आहे. 
 
माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांचा एक फोटो शेअर केला असून, त्यावर कॅप्शन लिहिलं आहे की, 'आज दुपारी कुडाळच्या जंगलात काही लोकांनी डुक्कर पकडला.' निलेश राणे यांच्या या ट्वीटवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. 'आपले वडील सुसंस्कृत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते याची तरी जाणीव ठेवा,' असा सल्ला एका ट्वीटर युझरने निलेश राणे निलेश राणेंना दिला आहे.
 
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर स्थापन झालेलं भाजपचं सरकार कोसळल्यावर विनायक राऊत यांनीही नारायण यांच्यावर विखारी टीका केली होती. 'विनायक राऊत यांनी ट्वीट करून राणे यांच्यावर टीका केली होती. राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की, 'अखेर नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले, आता नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे..'

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाण्यामधील भिवंडी मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

महाराष्ट्रात निकालाला चार दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा नाही, शिंदे नाराज का?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक, भारतात गेले 26 वर्षे 'बनावट' म्हणून राहत होता

LIVE: रामदास आठवलेंनी राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत मोठे वक्तव्य केले

कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 5 डॉक्टरांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments