Festival Posters

तर जनता नेते मंडळींना दणकाही देते :गडकरी

Webdunia
सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:07 IST)
स्वप्न दाखवणाऱ्या नेतेमंडळींना जनतेची पसंती मिळते खरी. पण, ही स्पप्न पूर्ण न झाल्यास याच जनतेचा रोषही ओढावला जातो, अशा आशयाचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा स्थापना सोहळ्याला ते बोलत होते. 
 
'स्वप्न दाखवणारी नेतेमंडळी जनतेला आवडतात, त्यांना जनतेची पसंती मिळते. पण, जर का ही स्वप्न पूर्ण झाली नाहीत तर मात्र याच राजकीय पटलावर जनता नेतेमंडळींना दणकाही देते', असं ते म्हणाले. इतर नेतेमंडळी आणि अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षांविषयी वक्तव्य करत असतानाच त्यांनी स्वत:विषयीसुद्धा सूचक विधान केलं. मी फक्त स्वप्न दाखवत नाही तर, ती पूर्णत्वासही नेतो, असं ते म्हणाले. 
 
मुंबईतील माध्यमांचे बरेच प्रतिनिधी मला ओळखत असून, एक व्यक्ती म्हणून मी कसा आहे हे ते चांगलच जाणतात, असं म्हणत कशा प्रकारे आपण घोषित प्रकल्प पूर्ण केले आहेत हे त्यांनी पाहिलं असल्याची बाबही गडकरींनी अधोरेखित केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात झालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे आठवण काढली

LIVE: Maharashtra Election Results भाजपला बहुमत मिळाले

लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळल्याने अहिल्यानगरमध्ये असंतोष; सरकारच्या निर्णयावर संताप

हत्तीने खाल्ला जिवंत बॉम्ब; तोंडात स्फोट झाल्याने प्रकृती गंभीर

नीलगायीचा कारची खिडकी फोडून आतमध्ये प्रवेश; आईच्या मांडीवर बसलेल्या ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments