Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपालांच्या विधानावर आता भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला

Webdunia
सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (15:27 IST)
राज्यपालांच्या विधानावर आता भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. भगतसिंग कोश्यारी यांना आता विस्मरण झालं असून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली पाहिजे. भगतसिंग कोश्यारींवर कारवाई केली नाही, तर मी माझ्या पद्धतीने योग्य वेळ आल्यावर जाहीर करेन, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.
 
राज्यातील प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय समाजकार्यासह राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. देशाला एकत्रित ठेवायचे असेल, तर छत्रपतींचे विचार जपावे लागतील; अन्यथा भविष्यात देशाचे तुकडे होतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला हटविणे, सरकारला जमत नसेल, तर त्यांची जीभ कशी हासडायची ते आम्ही बघतो, असं म्हणत राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांना इशारा दिला आहे.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही, राज्यपालांच्या मनातही याबद्दल शंका नसावी.'

Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री दत्तात्रेय भरणे यांचा मोठा दावा अजित पवार होणार पुण्याचे पालकमंत्री!

ठाण्यात एटीएसची कारवाई, 3 बांगलादेशी महिलांना अटक

अजित पवार होणार पुण्याचे पालकमंत्री! दत्तात्रय भरणे यांनी आतापर्यंत मंत्रीपद न स्वीकारण्याचे सांगितले कारण

रायगडमध्ये फ्लॅटमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळला

मुंबईत रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या तरुणाचे डोके खांबावर आदळल्याने मृत्यू

पुढील लेख
Show comments