suvichar

मुलाकडून आईचा छळ, कोर्टाने मुलाला दिला दणका

Webdunia
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (16:20 IST)
पुण्यातील एका ७४ वर्षीय वयोवृद्ध आईचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या मुलाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांच्या कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. या महिलेचा मुगला आणि त्याची पत्नी आईच्या फ्लॅटमध्ये घुसून त्यांचा छळ करत होते. आईचा फ्लॅट बळकवण्याचा त्यांचा कट होतो. मात्र वयोवृद्ध आईने याबाबत त्यांच्या विरोधात आईने कोर्टात दावा देखील केला होता. याबाबत कोर्टाने मुलाला दरमहा आईला दहा हजार देऊ करण्याचे सांगितले असून आईच्या फ्लॅटमध्ये येण्यास बंदी देखील केली आहे.
 
पिडीत महिलेला दोन विवाहित मुले आणि एक मुलगी आहे. तर या महिलेच्या पतीने निधन झाले. त्यानंतर ही महिला त्या फ्लॅटमध्ये एकटी राहत आहे. तर या महिलेचा मोठा मुलगा आपल्या कुटुंबासोबत वेगळा राहत होता. तर लहान मुलगा त्याची पत्नी आणि दोन मुले या महिलेच्या घरात बळजबरीने राहत होती. त्यामुळे वयोवृद्ध आईचा मुलगा आणि सून यांच्याकडून त्यांचा सतत छळ होत होता. आईला जेवायला न देणे, गॅस सिलिंडरचे बटण चालू ठेवणे, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, घाणेरड्या शिव्या देणे सुरु होते. या सर्व त्रासाला कंटाळून आईने वेळोवेळी आपल्या मुलाच्या आणि सूनेच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे हे एआय-आधारित वाहतूक व्यवस्थापन असलेले देशातील पहिले शहर बनले

T20 World Cup न्यूझीलंडने सह-यजमान श्रीलंकेचा ६१ धावांनी पराभव केला

रणजी ट्रॉफी फायनलमध्ये क्षेत्ररक्षकाला हेडबट मारल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या कर्णधाराला दंड

नागपूर: निरोप समारंभात झालेल्या निषेधामुळे ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला

नवी मुंबईतील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार

पुढील लेख
Show comments