Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Webdunia
रविवार, 19 मे 2024 (17:43 IST)
विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जून पासून गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु होणार आहे. सदर माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे. 
 
विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरातील संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरु असल्यामुळे 15 मार्च पासून पदस्पर्श दर्शन बंद होते. आता आषाढी वारी येत असल्याने मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
 
या बाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराजांच्या अध्यक्षतेसाठी आज मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली. या वेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित 30 टक्के कामासाठी वेळ लागणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले असून येत्या 2 जून पासून भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. आषाढी यात्रे निमित्त 7 जुलै पासून देवदर्शन 24 तास सुरु राहणार आहे. 

Edited by - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

LPG Price Cut: मोठा दिलासा! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सायबर बदमाशांनी मुंबईत एका वृद्ध महिलेला डिजीटल अटक केली... 1.25 कोटींची फसवणूक केली

UPI चा हा नवा नियम आजपासून लागू! व्यवहार आणि वॉलेट पेमेंटशी संबंधित बदलांबद्दल जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील कोराडी येथील जगदंबेचे दर्शन घेणार! चंद्रशेखर बावनकुळे यांना निमंत्रित केले

ATS ने महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांमध्ये छापे टाकून 9 अवैध बांगलादेशी नागरिकांना अटक केली

पुढील लेख
Show comments