मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. मेळाव्याला महादेव जानकर, राम शिंदे यांच्यासह पंकजा मुंडेंचे अनेक समर्थकही हजर होते. तर दुसरीकडे महंत नामदवेशास्त्रींच्या विरोधानंतर भगवानगडाची गर्दी ओसरल्याचे दिसले.
महंत नामदेवशास्त्रींनी भगवानगडावर दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांना विरोध केल्यानंतर, पंकजा मुंडेंनी यंदाचा दसरा मेळावा भगवानगडाच्या जन्मगावी म्हणजे बीडमधील सावरगावात घेण्याचा निर्णय घेतला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी समजाबांधवांना भावनिक साद देत त्यांना सर्वांगीण विकासाचे आश्वासनही दिले.