Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अचानकपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील फायर अलार्म वाजला

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2018 (09:56 IST)

पुन्हा एकदा मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील फायर अलार्म अचानक वाजू लागल्याने पोलिस अधिकारी तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता आग किंवा शॉट सर्किटचा प्रकार नसून तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. त्यामुळे  मंत्रालयातील फायर अलार्मने देखील पोलिस आणि अग्निशमन दलाचे लक्ष वेधून घेतली.  जून २०१२ मध्ये मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याला आग लागली होती. यात तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये जळून खाक झाली होती. तसेच तीन जनसंपर्क अधिकाऱ्यांसह १४ जण गंभीर जखमी झाले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १२ टक्के वाढ केली

कर्नाटकला जाणाऱ्या बसेसमध्ये सुरक्षा तैनात करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

LIVE: बसेसमध्ये सुरक्षा मार्शल किंवा पोलिस कर्मचारी तैनात करण्याचा विचार-सरनाईक

किसान क्रेडिट कार्डच्या नावाखाली आदिवासी व्यक्तीची १८ लाख रुपयांना फसवणूक

महाशिवरात्री शुभेच्छा मराठी Maha Shivratri 2025 Wishes in Marathi

पुढील लेख
Show comments