Festival Posters

पर्रीकर आजारी, गोव्यात होणार नेतृत्व बदल, कॉंग्रेसच्या जोरदार हालचाली

Webdunia
स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचार काळासाठी मुख्यमंत्री पद सोडणार आसल्याची माहिती पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेवरून पर्रीकर यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. पर्रीकर यांच्या  अनुपस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार  ज्येष्ठ मंत्री आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याकडे दिला जाणार  आहे.  
 
मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याने त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू असून,  अमेरिकेतील उपचारानंतर 6 सप्टेंबर रोजी पर्रीकर परतले  होते. आता  मात्र प्रकृती साथ देत नसल्याने ते कामकाज करू शकत नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ते प्रशासनात पूर्ण क्षमतेनं लक्ष घालू शकत नाही असे असल्याने  विरोधकांनी पूर्णवेळ काम करणारा सक्षम मुख्यमंत्री गोव्यासाठी द्यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे राजकीय परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी काँग्रेसने मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पर्रीकरांशी गोव्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. या चर्चेनंतरच हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

नागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

२ कोटी रुपये द्या नाहीतर...'सोलर ग्रुप'चे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या; संशयिताला ताब्यात घेण्यात आले

LIVE: सोलर ग्रुपचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना जीवे मारण्याची धमकी

प्रयागराजमध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान तलावात कोसळले

LIVE: मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत

पुढील लेख
Show comments