Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘अमरावती, ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू असलेल्या निर्बंधात अंशत: बदल

Webdunia
मंगळवार, 25 मे 2021 (13:03 IST)
अमरावती जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 1 जून 2021 पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे. तथापि या निर्बंधात काही बाबी संदर्भात अंशत: बदल करण्यात आलेला आहे.
 
त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती, घाऊक बाजापेठ, मोठ्या बाजारपेठा, भाजी मार्केट उदा. इतवारा बाजार, सक्करसाथ इत्यादी येथे किरकोळ व चिल्लर विक्रेते यांना परवानगी अनुज्ञेय राहील. तथापि थेट ग्राहकांना खरेदीकरीता जाता येणार नाही. याठिकाणी दुचाकी वाहन चालकांनी वाहन हे वाहनस्थळी उभे करावे. शक्य झाल्यास सायकलचा वापर करावा.
 
पिकअप व्हॅन, टाटा अेस (2 टन वाहतूकीची क्षमता) इ. वाहनांचा उपरोक्त परिसरातून वाहतूक करण्याची परवानगी अनुज्ञेय राहील. परंतू लोडींग ट्रक, मालवाहतूक करणारे मोठे ट्रक इत्यादी वाहनांना (2 टन ते 8 टन व त्यापेक्षा जास्त वाहतूक क्षमता) या परिसरातून सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यं वाहतूक करण्यास मनाई राहील.
 
अमरावती जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती, घाऊक बाजापेठ, मोठ्या बाजारपेठा यांनी त्यांच्या स्तरावरुन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करुन स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समवेत समन्वय ठेऊन गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीचे विकेंद्रीकरण करावे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी.
 
उपभोक्ता किंवा सामान्य नागरिकांनी आपल्या जवळच्या अतिपरिचित दुकानातून खरेदी करावी. घाऊक बाजारपेठेमध्ये ग्राहकांना थेट खरेदी करण्याकरीता प्रवेश नाही. वरीलप्रमाणे निर्देशांचे महापालिका आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगरपालिका आदींनी पोलीस विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी संघटना यांच्या समवेत समन्वय साधून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी  यांनी दिले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments