rashifal-2026

पीएफआय ‘सायलेंट किलर’ - फडणवीस

Webdunia
बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:53 IST)
छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पीएफआय) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक होते, देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती या कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआय ‘सायलेंट किलर’ असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.
 
“पीएफआयविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. देशात गैरकृत्य करण्यासाठी या संघटनेने आर्थिक यंत्रणा तयार केली होती. खूप मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडायची आणि या खात्यांमध्ये कुणाला संशय येऊ नये, यासाठी थोडे पैसे जमा करायचे”, असा प्रकार या संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआयवर घातलेल्या बंदीसंदर्भात लवकरच राज्यांना अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यानुसार पीएफआय आणि संबंधित सहा संघटनांवर कारवाई करू, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

छत्रपती शिवाजी महाराज टिपू सुलतान तुलनेचा वादावरून पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, दोन महिला पोलिस अधिकारी जखमी

LIVE: पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, दोन महिला पोलिस अधिकारी जखमी

टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

IND vs PAK: भारताने पाकिस्तानला 61 धावांनी हरवून सुपर 8 मध्ये प्रवेश केला

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments