Festival Posters

प्लास्टिक चलनी नोटांचे काम नाशिकला मिळावे

Webdunia
बुधवार, 14 डिसेंबर 2016 (17:12 IST)
काही दिवसांपूर्वी  केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी देशात प्लास्टिक चलनी नोटा व्यवहारात आणण्याचे जाहीर केले आहे. या नोटा आयात न करता, नाशिकरोड प्रेसला हे काम मिळावे, अशी मागणी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे यांनी केली आहे.
 
याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन् २०१४ साली प्लॅस्टिक नोटा बनविण्याचा व या नोटा बाहेरच्या देशातून मागविण्याचा प्रश्न चर्चेत आला होता. मजदूर संघाने प्लॅस्टिक नोट आयातीला तेव्हाच आक्षेप घेतला होता. मजदूर संघाच्या नेत्यांनी रिझर्व बँकेच्या गर्व्हनरला भेटून प्लॅस्टिक नोटांचे काम नाशिकरोड प्रेसला मिळावे, अशी मागणी केली होती. प्लॅस्टिक नोटा छापण्याचे तंत्रज्ञान नाशिकरोड प्रेसमध्ये आहे. प्रेस कामगारही कुशल आणि मेहनती आहेत. फक्त मशिनरी अपग्रेडेशन करण्याची गरज आहे. ते झाल्यास प्लॅस्टिक नोटा येथे छापता येतील,असा दावाही त्यांनी केला आहे.प्लॅस्टिक नोटा छापण्याचा निर्णय होईल तेव्हा आमचे कामगार या नोटा छापून देण्यास सक्षम राहतील, असा विश्वास प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी व्यक्त केला.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात झालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे आठवण काढली

LIVE: Maharashtra Election Results भाजपला बहुमत मिळाले

लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळल्याने अहिल्यानगरमध्ये असंतोष; सरकारच्या निर्णयावर संताप

हत्तीने खाल्ला जिवंत बॉम्ब; तोंडात स्फोट झाल्याने प्रकृती गंभीर

नीलगायीचा कारची खिडकी फोडून आतमध्ये प्रवेश; आईच्या मांडीवर बसलेल्या ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments