Marathi Biodata Maker

ईएसआयसी रूग्णालयासाठी एमआयडीसीने उपलब्ध करून दिला भूखंड

Webdunia
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (08:13 IST)
जळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळासाठी (ईएसआयसी) रूग्णालयासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एमआयडीसी क्षेत्रात अवघा १ रूपया चौरस मीटरमध्ये जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रूग्णालयांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
जळगाव शहर व जिल्ह्यातील कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त शासकीय रूग्णालय असावे, अशी जिल्ह्यातील कामगारांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यासाठी खा.उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून कामगारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना रूग्णालयासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आ.सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी पुढाकार घेत सप्टेंबर २०२३ महिन्यात जागेचा शोध घेतला. त्यासाठी पाच सदस्यीय समितीने एमआयडीसीतील जागांची पाहणी करून रूग्णालयासाठी भूखंड क्रमांक २१६९४ मध्ये रूग्णालयासाठी ५ हजार ४२५ चौरस मीटर जागा अंतिम करत एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. प्रस्तावाचा शासनपातळीवर उद्योग मंत्रालयाकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी पाठपुरावा केला. एमआयडीसीने रूग्णालयांसाठी एक रूपया चौरस मीटरप्रमाणे जागा उपलब्ध करून दिली आहे. याबाबत २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक वासुदेव सपकाळे यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळ, मुंबई यांना रूग्णालयासाठी जागा मागणीचा प्रस्तावही दिला आहे. राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडे लवकरच रूग्णालयासाठी जागा हस्तांतरित होणार आहे.
 
औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला निर्णय ईएसआयसी रूग्णालयासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे महसूल, कामगार महामंडळ, ईएसआयसी प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

महिलेच्या मृत्यूनंतर कूपर रुग्णालयात गोंधळ, जुहू पोलिसांनी नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला

LIVE: नागपुरात रक्तरंजित बर्थडे पार्टी, छत्रपती चौकात ऑटोरिक्षातून उतरताच हल्ला

बीएमसी निवडणुकीत 32 जागांसाठी थेट लढत निश्चित

Bank Holiday January 2026: या महिन्यात बँका 16 दिवस बंद राहतील, संपूर्ण लिस्ट जाणून घ्या

अंधेरी पश्चिममध्ये बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस, 7 जणांना अटक

पुढील लेख
Show comments