Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (14:33 IST)
पंत प्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 26 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय महाराष्ट्र -गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहे. महाराष्ट्रात ते दुपारी 1 वाजता शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार आहे. या मंदिरातील नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उदघाटन ते करणार आहे.  नंतर ते अहमदनगर येथे निळवंडे धरणाचे जलपूजन करणार आहे. या दौऱ्यात ते अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार.

पंत प्रधान मोदी हे दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिर्डीच्या काकडी ग्राउंड वर कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन ते करणार असून त्यांनतर ते गोव्याला जाणार आणि संध्याकाळी 6:37 वाजता गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन करणार. या स्पर्धेसाठी भारतीय प्रोफेशनल विंड सर्फर कात्या इडा कोएल्हो गुरुवारी 37 व्या राष्ट्रीय खेळांच्या उदघाटनासाठी पंत प्रधानांकडे मशाल सुपूर्द करतील. हा उदघाटन सोहळा फातोर्डातील नेहरू स्टेडियमवर पाच तास चालणार आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. 
 

Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments