rashifal-2026

आघाडीत घेण्यासाठी हा निव्वळ दिखावा : प्रकाश आंबेडकर

Webdunia
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेला हा आघाडीचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स असल्याचं टीकास्त्र भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोडलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं लोकसभेचं जागावाटप पूर्ण झालं आहे. 
 
त्यामुळे आम्हाला आघाडीत घेण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेला प्रयत्न हा निव्वळ दिखावा असल्याचं आंबेडकर म्हणाले. 
 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र यावर आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं लोकसभा निवडणुकीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं. त्यामुळे भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्याबद्दलची चर्चा म्हणजे केवळ फार्स आहे,' अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

बदलापूरमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्कूल व्हॅन चालकाला अटक

दावोस दौऱ्यामुळे महाराष्ट्राला मोठी भेट; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

मालेगाव न्यायालयाने संजय राऊत यांना दंड ठोठावला; न्यायालयात अनुपस्थिती महागात पडली

अकोला रेल्वे स्थानकावर गांजा तस्करीचा पर्दाफाश,आरोपीला अटक

LIVE: मालेगाव न्यायालयाने संजय राऊत यांना दंड ठोठावला

पुढील लेख
Show comments