rashifal-2026

पैशांचा पाऊस पाडतो सांगणारे गजाआड

Webdunia
पुण्यातल्या पिंपरीत घरात पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत मांडूळ विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या दोघांकडून पाच लाख रुपये किंमत असलेला मांडूळ जातीचा सापही जप्त केला आहे. हेमंत संजू पवार आणि आकाश वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पवार आणि आकाश वाघमारे हे दोघे मांडूळ विकणार असून ते ग्राहकाच्या शोधात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर  पोलीस शिपाई मालुसरे यांनी या दोघांशी ग्राहक म्हणून संपर्क साधला. चार लाख रुपयांमध्ये मांडुळाचा व्यवहार ठरला. मालुसरे यांना या दोघांना नाशिक-पुणे महामार्गावरच्या मोशी या ठिकाणी बोलावले. ठरल्यानुसार मालुसरे ग्राहक बनून या दोघांना भेटण्यासाठी गेले. तिथे हे दोघे येताच सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

मुंबई: वडाळा येथे कंटेनरमधून ४० टन लोखंडी प्लेट कारवर पडल्याने कॅब चालकाचा मृत्यू

LIVE: एमएससी बँक घोटाळ्यात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

अंधेरीच्या हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, युगांडाच्या दोन महिलांची सुटका

अजित पवारांच्या निधनाला 1 महिना पूर्ण; सुनेत्रा पवारांनी केली भावनिक पोस्ट

मराठीला रोजगार आणि तंत्रज्ञानाची भाषा बनवणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा संकल्प

पुढील लेख
Show comments