Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या आजोबांनी चालकाला भेटवस्तू आणि रोख रकमेचे आमिष दाखवले,पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Webdunia
शनिवार, 25 मे 2024 (18:54 IST)
पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगाने भरधाव गाडी चालवत दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन अभियंताचा दुर्देवी मृत्यू झाला. न्यायालयाने अल्पवयीन मुलाला रास्ता अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले आणि जामिनावर सोडले. तेव्हा देशभरात याची चर्चा झाली. प्रश्न उपस्थित झाल्यावर सरकार आणि प्रशासन जागे झाले.आता पुण्याचे पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांनी याप्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. 

 त्यांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांनी आणि आजोबांनी त्यांच्या चालकाला भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली. यानंतर त्याला या अपघाताची जबाबदारी घेण्याची धमकी देण्यात आली. चालक आणि त्याच्या कुटुंबीयांना आता पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे.पोलिसांनी अल्पवयीन आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला अटक करून न्यायालयात हजर केले व सात दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने अग्रवाल यांना 28 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे. 
 
पोलिस आयुक्तांचे म्हणणे आहे की, याआधी ड्रायव्हरने अपघाताच्या दिवशी गाडी चालवत असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर ही कार चालकाने चालवली नसून एका अल्पवयीन व्यक्तीने चालवली असल्याचे समोर आले. पोलिस आयुक्त पुढे म्हणाले की, चालक खूप घाबरला होता. वस्तुस्थितीची पुष्टी केल्यानंतर अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 अमितेश कुमार पुढे म्हणाले की, ड्रायव्हर येरवडा पोलिस स्टेशनला जात असताना, अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आणि आजोबांनी त्याला त्यांच्या कारमध्ये बसवले. यानंतर दोघांनी चालकाचा फोन जप्त केला आणि त्याला त्यांच्या बंगल्यात कैद केले. अल्पवयीन मुलीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल व वडील विशाल अग्रवाल यांनी चालकाला त्यांच्या सूचनेनुसार जबाब देण्याची धमकी दिली. यानंतर चालकाला भेटवस्तू आणि रोख रक्कम देण्यात आली. यावेळी त्यांना सर्व आरोप स्वत:वर घेण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरची पत्नी दुसऱ्या दिवशी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या बंगल्यावर पोहोचली आणि पतीला सोडवले. 
 
विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आयपीसी कलम 365 (एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेण्याच्या उद्देशाने अपहरण) आणि 368 (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी येरवडा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दुसरीकडे, अल्पवयीन मुलाला 5 जूनपर्यंत निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

सर्व पहा

नवीन

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments