Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 17 जिल्ह्यात कोसळणार पाऊस, अवकाळी पावसाचा इशारा

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (09:41 IST)
सध्या देशात सर्वत्र उकाडा सुरु आहे. महाराष्ट्रात काही भागात पाऊस कोसळत आहे. तर काही भागात प्रचंड उकाडा आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या दोन दिवांपासून तापमान 40 च्या पुढे गेलं आहे. सर्वाधिक तापमान जळगावचे नोंद केले गेले. मुंबईत पण नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. 

राज्यातील काही जिल्ह्यात आज मंगळवार रोजी बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पासून 5 दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून काही जिल्ह्याना यलो अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह तशी 50 ते 60 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर विदर्भात बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशीम,यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया भागात वादळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तव्यात आली आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

Israel-Hamas War :शनिवारी आणखी सहा इस्रायली बंधकांची सुटका केली जाईल

आयओए पॅनल सोडण्याच्या वृत्ताचे मेरी कोमने खंडन केले, म्हणाली- मी राजीनामा दिला नाही

LIVE: मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आज छत्रपती शिवाजी महाराजयांच्या 395 व्या जयंती निमित्त जुन्नरला पोहोचणार

GG W vs MI W: मुंबईइंडियन्सचा गुजरात जायंट्सवर 5 गडी राखून पाचवा विजय

भारतीय महिला हॉकी संघ स्पेनविरुद्ध विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल

पुढील लेख
Show comments