Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यसभेची निवडणूक रंगतदार ठरणार, शिवसेना, राष्ट्रवादीची अडचण

Webdunia
बुधवार, 31 जानेवारी 2024 (11:25 IST)
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी १६ राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणा-या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून त्यासाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान हे खुले मतदान असल्याने पक्षादेश म्हणजे व्हीप महत्वाचा ठरणार आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.  राष्ट्रवादी बाबतही अध्यक्षांचा निकाल आल्यानंतर हाच प्रश्न निर्माण होऊ शकतो.
 
जुलै २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने आघाडीची मते फोडून चौथा उमेदवार विजयी केला होता. या निवडणुकीत आघाडीच्या फुटीची बीजे पेरली गेली होती. त्यानंतरच्या विधान परिषद निवडणुकीत आघाडीचा पराभव निश्चित करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर आघाडी सरकारला आणि मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला.
 
या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मतांचे गणित जमवून मतदान केले होते. त्यामुळे विजयी उमेदवाराच्या अतिरिक्त मतांवर भाजपने चौथा उमेदवार निवडून आणला होता. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे.
 
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी अधिसूचना जारी होणार आहे. १५ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १६ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. या निवडणुकीत २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतीळ. तर २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल घोषित केले जातील. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषत: जांभळ््या रंगाचे स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
 
शिवसेना, राष्ट्रवादीची अडचण
काँग्रेसकडे स्वत:चे ४४ आमदार असल्याने त्यांची एक जागा निवडून येईल. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे १५ ते १६ आमदार तर शरद पवारांकडे ११ आमदार आहेत. दोघांनी मिळून एकच उमेदवार दिला तरी अतिरिक्त मते बाहेरून मिळवावी लागणार आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभा निवडणुकीत विजयाचे गणित जमविणे अवघड आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू झाल्यास ठाकरे गटाची कोंडी होणार आहे. सध्या कॉंग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या अनिल देसाई यांचा कार्यकाल संपणार आहे.
 
महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल
भाजप : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०, काँग्रेस : ४५, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३. एकूण २८७

Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

‘अपूर्ण ज्ञान अधर्माला जन्म देते’, म्हणाले आरएसएस प्रमुख मोहन भागवत

अल्लू-अर्जुनच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत सीएम रेवंत रेड्डी यांचे वक्तव्य आले समोर

LIVE: पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडले

मंत्रिमंडळ वाटपनंतर अजित पवारांचे वक्तव्य, म्हणाले काही मंत्री नाराज आहे

पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले

पुढील लेख
Show comments