Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर- मुंबई मार्गावर एक ऑक्टोंबरपासून नियमित विमानसेवा सुरू होणार

Webdunia
गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (21:25 IST)
कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे. कोल्हापूरच्या विमानतळाचा जलद गतीने विकास होत असतानाच आता कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा करून,कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सोयीस्कर वेळेत दैनंदिन विमानसेवा सुरू करण्यात यश मिळवले आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून स्टार एअर या नामांकित कंपनीकडून, कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर दैनंदिन विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातील सातही दिवस मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी,उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय होणार आहे.
 
1 ऑक्टोबर पासून स्टार एअर कंपनीकडून ही दैनंदिन विमानसेवा सुरू होईल.त्यानुसार रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेदहा वाजता हे विमान कोल्हापुरात येईल.त्यानंतर सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी,कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान झेप घेईल आणि सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर उतरेल त्यामुळे दिवसभरातील मुंबईतील कार्यालयीन कामे करणे सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे.आठवड्यातील सातही दिवस मुंबई -कोल्हापूर- मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू होत असल्याने, निश्चितच कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

घराला भीषण लागल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

नितीन राऊत यांनी विधानसभेत नागपूरच्या नारा नॅशनल पार्कचा सरकारने विकास करावा असा मुद्दा उपस्थित केला

माजी विद्यार्थी चाकू घेऊन शाळेत घुसला, मुलांना पाहताच केला हल्ला, 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना

पुढील लेख
Show comments