Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ शिंदे बंड : राजीनामे द्या आणि निवडणूक लढा, पाडल्या शिवाय राहणार नाही – आदित्य ठाकरे

Webdunia
रविवार, 26 जून 2022 (16:03 IST)
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी 40 हून अधिक आमदारांसह बंड केलं आणि सुरतमार्गे आसाममधील गुवाहाटीला जाऊन थांबले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही आपापल्या भूमिका मांडत असतानाच, सर्वसामान्य शिवसैनिक मात्र आक्रमक झालेत.
 
या शिवसैनिकांमध्येही दोन गट दिसून येतायत. कुणी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ मोर्चे काढतंय, तर कुणी विरोधात निदर्शनं करतंय. विरोधातल्या निदर्शनांची संख्या मात्र जास्त आणि आक्रमकही दिसून येतेय.
 
शिंदे गटातील आमदारांविरोधात आरपारची लढाई लढण्याचे संकेत शिवसेनेच्या गोटातून समोर येत असल्याने राज्यभरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरून शिंदे गटातील आमदारांविरोधात मोर्चे काढतायेत. अनेक ठिकाणी जाळपोळ, बॅनर फाडणं, प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणे असले प्रकारही घडल्याचे दिसून आले आहेत.
 
शिवसेनेच्या अभूतपूर्व बंडानंतर महाराष्ट्रात काय पडसाद उमटतायेत, हे आपण पाहूया.
 
राजीनामे द्या आणि निवडणूक लढा, पाडल्याशिवाय राहणार नाही - आदित्य ठाकरे
"आज राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, आम्ही तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही," असं आव्हान युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांना दिलंय.
 
"धनुष्यबाण आपल्याकडेच (शिवसेनेकडे) राहणार आहे. शिंदे गटाला प्रहार किंवा भाजपमध्ये विलीन होण्याचाच पर्याय आहे. त्यांचं स्वत:चं अस्तित्त्व संपणार आहे," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
 
आदित्य ठाकरेंचा कालिना आणि कुर्ला विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा होता. तिथं त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषणं केली.
 
आदित्य ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
 
* दिलीप मामा लांडे परवा हातात हात घालून रडलेला माणूस कसा जाऊ शकतो?  
* मी जास्तीत जास्त फंड संदीपान भुमरे, शिरसाट, मराठवाड्यासाठी दिलाय, मला आश्चर्य वाटतं ते गुवाहाटीला गेले.
* आपण जनतेसाठी हा पैसा देतो स्वतःला विकायला नाही
* 15 वर्षात किती फंड मिळायचा आणि आता किती मिळतोय सांगा
* बंडखोरांना आव्हान माझ्यासमोर येऊन बसा डोळ्यात डोळे घालून बघा सांगा काय कमी केलं
* हिंमत असेल तर निवडणूक लढा, प्रत्येकाला पाडल्याशिवाय राहणार नाही गाठ माझ्याशी आहे
* जिथे पूर आलाय लोकांना खायला अन्न नाही अशा ठिकाणी तुम्ही मजा मारायला जाता?
* आम्हीच शिवसेना, बाळासाहेब ठाकरे नाव लावतात तुमची लायकी असती, तर सुरतमध्ये पळाला असता?
* उद्धवजींनी मोह सोडलाय जिद्द, ताकद नाही
* प्रत्येक आमदार तिथे गेला तरी विजय शिवसेनेचाच होणार
* साहेब तुम्ही जास्ती विश्वास टाकला, असं म्हणतात तेव्हा उद्धव जी म्हणतात शिवसैनिकवर विश्वास नाही टाकायचा तर कोणावर टाकायचा
* प्रत्येक आमदाराचे मान पकडून, हात पकडून कैद्यासारखे सुरत ते गुवाहाटी फरपटत नेले असे व्हीडिओ आहेत.
 
सदा सरवणकरांच्या घराबाहेर CRPF ची सुरक्षा
 
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत आहेत.
 
बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या सरवणकरांच्या दादरमधील घराबाहेर CRPF च्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
 
शिवसेनेचं मुख्यालय असलेला सेनाभवन हे सदा सरवणकरांच्या मतदारसंघात येतो.
 
सदा सरवणकर माहीम विधानसभेचे आमदार आहेत. ही त्यांची दुसरी टर्म आहे. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ते निवडणूक हरले होते. मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते.
 
2017 मध्ये सरवणकर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 2019 साठी त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. तसंच त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनाही बीएमसी निवडणुकीत संधी दिली. ते या भागाचे नगरसेवक आहेत.
 
सेनाभवनाच्या आमदारानेही बंड केल्याने शिवसैनिकांमध्ये अधिक रोष आहे.
 
'सिल्व्हर ओक'वर महाविकास आघाडीची बैठक
 
शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
 
या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.
 
आमदारांना अपात्र ठरवण्याच्या नोटीशीला आव्हान दिल्यास कायदेशीर प्रक्रियेबाबत या बैठकीत चर्चा झाली.
 
आबिटकरांचं ऑफिस फोडलं, क्षीरसागरांचे पोस्टर फाडले
एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सामील झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये अबीटकर आणि क्षीरसागर यांच्या विरोधात शिवसैनिकांच्यावतीने आंदोलन करण्यात येतंय.
 
आजाऱ्यात संतप्त शिवसैनिकांनी आबिटकरांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे, तर क्षीरसागर यांच्या पोस्टरचे दहन करण्यात आले आहे.
 
यावरून कोल्हापूरचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये एकमेकांना धमकी देण्याचा प्रकार झाला आहे.
 
परभणीत शिवसैनिकांकडून अनोख्या पद्धतीने निदर्शनं
परभरणीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमा गाढवांवर लटकवल्या आणि चपलांचे हार घालून गाढवांना शहरात फिरवलं.
 
तसंच, बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहनही केलं.
 
यावेळी शिवसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

PKL 2024: तमिळ थलायवासने यूपी योद्धास 14 गुणांनी पराभूत केले

इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्धविराम

LIVE: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

महाराष्ट्रात भाजप अडचणीत, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना प्रतिउत्तर देत म्हणाले- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड न्हवती का?

पुढील लेख
Show comments