Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जुलैत राजकीय भूकंप तर मध्यावधीची शक्यता – खा.संजय राऊत

Webdunia
शनिवार, 10 जून 2017 (16:40 IST)

शिवसेनने आपली सरकारवर नाराजी उघड केली आहे. ज्या सरकारला शेतकरी वर्गाची किंमत नाही ते सरकार काय कामाचे, शेतकारी आत्महत्या करत आहे. गेल्या वर्षात सुमारे साडेचार शेतकरयानी आत्महत्या केल्या आहेत.तरही सरकार शेतकरी वर्गाला कर्ज मुक्ती देत नाही.आज कांदे फेकतोय उद्या भाजपाला फेकू असे म्हणत जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपणार आहे. त्याचेच संकेत संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये दिले आहेत. शिवसेनेच्या संपर्क अभियानात ते बोलत होते.त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.शिवसेनेनेही मध्यावधी निवडणूकांसाठी सज्ज असल्याचे संकेत आज दिले आहेत.तसे अप्रत्यक्ष पणे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जुलैमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतोवाच करून मध्यावधी निवडणूकांना शिवसेना सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.समृद्धी महामार्ग कोणत्याही स्थितीत होऊ देणार नसल्याचा उद्धव ठाकरे यांचा शब्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

शपथ घेण्याच्या 11 दिवस आधी डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

पुढील लेख
Show comments