Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिरजेत सात किलो गांजा जप्त; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Webdunia
शुक्रवार, 16 जून 2023 (08:22 IST)
शहरातील एसटी स्टँडजवळ गांजा वाहतूक करणारी रिक्षा पकडून महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी संशयीत वैभव राजू कनशेट्टी (वय 30, रा. तानाजी चौक, मंगळवार पेठ, मिरज) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सहा किलो, आठशे ग्रॅमचा गांजा आणि एक रिक्षा असा तीन लाख, 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजा तस्करांच्या मुळाशी पोहचून मोठ्या तस्करांचा सहभाग यातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गांधी चौकीचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 
बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास एसटी स्टँड परिसरात एका रिक्षातून गांजा तस्करी केली जाणार असल्याबाबत पोलिसांना गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा लावला होता. या दरम्यान ग्रामीण एसटी स्थानकाजवळ रिक्षा (एमएच-10-के-3024) संशयास्पदरित्या जाताना आढळून आली. पोलिसांनी सदर रिक्षा पकडून तपासणी केली असता एका पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टीक पिशवीमध्ये उग्र वासाचा हिरवट रंगाचा पाला आढळून आला. पोलिसांनी सदर पिशवी उघडून तपासणी केली असता, त्यात सुमारे सहा किलो, 800 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.
 
रिक्षा चालक असलेल्या संशयीत वैभव कनशेट्टी याला अटक कऊन रिक्षासह गांजा असा एकूण 3 लाख, 20 हजार ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरचा गांजा कोठून आणला, कोठे घेऊन जाणार होता? याबाबत संशयिताकडे अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान, या गांजा तस्करी प्रकरणात आणखी काही आरोपींची नांवे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. मुख्य गांजा तस्करापर्यंत पोहचण्यासाठी पोलिस कसून तपास करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, धनंजय चव्हाण, सचिन कुंभार, जावेद शेख, बसवराज कुंदगोळ, प्रविण हुक्कीरे या पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेर मोठा स्फोट

LIVE: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी तीन मोठी नावे पुढे

महाराष्ट्र बिहारच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार? मुख्यमंत्रीपदावर शिंदे किंवा फडणवीस किंवा अजित पवार

Maharashtra Election Result : एकनाथ शिंदेंनी प्रिय बहिणींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments