Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमातील शारिरीक संबंध 'बलात्कार' नाही

Webdunia
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रेमातील शारिरीक संबंध हे बलात्कार नसल्याचे म्हटले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीयुगुलातील शारिरीक संबंध हा कधीच बलात्कार समजला जाणार नाही. दोघांच्या सहमतीने आलेली ही जवळीक बलात्कार नसल्याच हायकोर्टाने म्हटलं आहे. 
 
योगेश पालेकरवर एका महिलेने लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणी न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंड ठोठावला होता. 2013 मधील या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीची शिक्षा आणि दंड रद्द केला. योगेश गोव्यातील एका कॅसिनोमध्ये शेफ म्हणून काम करत होता, तेथेच काम करणा-या एका तरूणीसोबत तो रिलेशनमध्ये होता.
 
कॅसिनोमध्ये काम करणारा आरोपी योगेश आणि तक्रारदार महिलेची 2013 मध्ये ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. शेफ असलेल्या योगेशने महिलेला कुटुंबीयांशी ओळख करुन देण्यासाठी घरी नेलं. मात्र त्याच्या घरी त्यावेळी कोणीच नव्हतं. तक्रारदार महिला त्या रात्री आरोपीच्या घरीच राहिली. दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने तिला घरी सोडलं. त्यानंतरही तीन ते चार वेळा दोघांमध्ये शरीरसंबंध आले. महिला कनिष्ठ जातीची असल्याचं कारण सांगून आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने बलात्काराची तक्रार दिली. आरोपीने लग्नाचं वचन दिल्यामुळे आपण शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिल्याची कबुली तिने दिली. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख