suvichar

फडणवीस बहुमत सिद्ध करू शकणार नाही: शरद पवार

Webdunia
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (13:24 IST)
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना असे घडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
 
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात शरद पवार यांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. 30 नोव्हेंबरला पुढचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यात त्यांना यश येणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अजूनही एकत्र आहेत. पुढेही एकत्रच राहाणार आहेत. असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
 
आज सकाळी शपथविधीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी आपल्याला शपथविधीची काहीच कल्पना नव्हती असं या पत्रकारपरिषदेत सांगितले. 'रात्री बारा वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर. सकाळी सातला एका ठिकाणी बोलावण्यात आलं. त्यानंतर एका ठिकाणी जायचंय असं सांगण्यात आलं. राजभवनावर जाईपर्यंत कशासाठी जातोय याची कल्पना नव्हती. तिथे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे तिथे होते. थोड्याच वेळात शपथविधी झाला. आम्ही अस्वस्थ होतो. शपथविधी झाल्यानंतर तात्काळ पवार साहेबांकडे आलो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहोत', असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.
 
अजित पवार फुटून जातील असं वाटलं नव्हतं असे म्हणत सकाळच्या शपथविधीसाठी दहा ते अकरा आमदार आम्हाला फोटोत दिसले. तीनजण या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. आणखी काही आमदार परत येत आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी गुजरातला राजस्थानला हरवावे लागेल

LIVE: NCRB अहवाल २०२४: महाराष्ट्रात मुलांवरील अत्याचारांचे प्रमाण सर्वाधिक

मुंबईतील महाविद्यालयात बनावट अभ्यासक्रम आणि पदव्यांच्या नावाखाली १३२ विद्यार्थ्यांची फसवणूक; चंद्रकांत पाटील यांनी कठोर कारवाई केली

थलपती विजय यांच्या शपथविधीला ब्रेक

Hantavirus उंदरांपासून उद्भवलेला संसर्ग: २३ देशांपर्यंत पसरला धोका! 'MV Hondius' क्रूझ जहाजाद्वारे पसरला घातक 'हँटाव्हायरस'

पुढील लेख
Show comments