Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

Webdunia
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (13:13 IST)
महाविकास आघाडीची सत्ता 5 वर्षे राहील
राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन केली असून आता या तीनही पक्षात कायम एकी राहील. पूर्ण पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असेल, असे मत देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
 
पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, भारत हा लोकशाहीसमृद्ध देश आहे. या देशामध्ये कोणाची हुकूमशाही चालणार नाही. आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तेसंदर्भात निर्णय देऊन हे सिद्ध केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे आदरपूर्वक स्वागत करतो. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी महाविकास आघाडीत कायम एकी राहील. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे. धर्मनिरपेक्ष संदर्भात शिवसेनेनेही आपली काही तत्त्वे बाजूला ठेवली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पाच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता कायम राहणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे भारतीय घटनेवर हात ठेवून शपथ घेण्यासंदर्भात सांगत होते. भारतीय संविधान व घटना फार महान आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

वाराणसीहून मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या चोराला मुंबई पोलिसांनी केली अटक

LIVE: राज ठाकरेंवर बँक युनियनचा संताप

सत्तेसाठी पवार लाचार... सपकाळ यांचा हल्लाबोल, म्हणाले- वक्फच्या नावाखाली मुस्लिम समुदायाचा विश्वासघात

पुण्यातील रुग्णालयाने गर्भवती महिलेला दाखल केले नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले हे आदेश

बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरें गटातील 25 वरिष्ठ नेते शिंदे गटात सामील

पुढील लेख
Show comments