Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिर्डी साई बाबा संस्थानला दररोज दीड कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान

Webdunia
बुधवार, 6 मे 2020 (22:08 IST)
लॉकडाऊनमुळे  शिर्डी साई बाबा संस्थानला दररोज जवळपास दीड कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान होत आहे. साईंच्या चरणी भक्तांकडून  दररोज 1 कोटी 64 लाख रुपयांहून अधिक दान दिलं जातं. लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने 17 मार्च ते 3 मेपर्यंत ऑनलाईन डोनेशनद्वारे 2 कोटी 53 लाखांहून अधिक रुपयांचं दान देण्यात आलं आहे. म्हणजे दररोज दान रुपात 6 लाख रुपये देण्यात आले आहेत.
 
शिर्डी संस्थानकडून अनेक प्रकारची सामाजिक कामं केली जातात. शिर्डी संस्थानकडून भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणारा लाडू स्वस्त दरात दिला जातो. संस्थान दरवर्षी या लाडूवर 40 कोटी रुपये खर्च करते. त्याशिवाय शिर्डी संस्थानकडून दरवर्षी हजारोंच्या संख्येने रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. या उपचारांमध्ये हृदयशस्त्रक्रिया किंवा मोठ्या संख्येत डायलिसिसच्या मशिन लावण्यापासून इतर आजारांवरही मोफत उपचार केले जातात.
 
संस्थानकडून मेडिकलवर दरवर्षी 100 कोटी रुपये खर्च करण्यात येतात. शिर्डी संस्थानकडून मोठ्या संख्येने गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. साई बाबा मंदिर साफ, स्वच्छ ठेवण्यासाठी, तेथील व्यवस्था चालवण्यासाठी जवळपास 8000 कर्मचारी दिवस-रात्र काम करतात. या सर्वांवर साई संस्थान दरवर्षी 160 कोटी रुपये खर्च करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

EPFO 3.0 मध्ये मोठे बदल होणार आहेत, तुम्ही ATM मधून PF चे पैसे काढू शकाल

महाराष्ट्र महायुतीची बैठक पुढे ढकलली, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कधी मिळणार एकनाथ शिंदे यांनी सांगितले

गोंदियात दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली,12 जणांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments