Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसैनिकांनी नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक केली, राणे यांच्या अटकेसाठी पोलीस निघाले

Webdunia
मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (12:03 IST)
दगडफेक करणारे हे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप आहे.राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज झाले आहेत
 
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वाद वाढत आहे. राज्यभरात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.दरम्यान,नाशिक येथील भाजप कार्यालयात दगडफेकीचे प्रकरण समोर आले आहे.दगडफेक करणारे हे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर सांगलीत राणेंच्या पोस्टरला काळं करण्याचे प्रकरणही समोर आले आहे.दरम्यान, राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस निघाल्याचे वृत्त आहे. 
 
 राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात निवेदन दिले होते.या वक्तव्यात ठाकरे यांच्यावर टीका करण्याबरोबरच त्यांना कानाखाली लावण्याचे बोलले होते.या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.त्यानंतर नाशिक पोलीस त्यांच्या अटकेसाठी रत्नागिरीला रवाना झाले आहेत.
 
अटकेबद्दल विचारले असता,केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की,मला माहिती नाही की माझ्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.मी कोणताही गुन्हा केलेला नाही.जर 15 ऑगस्ट बद्दल कोणाला माहिती नसेल तर तो गुन्हा नाही का? मी म्हणालो की मी कानाखालीच चढवली असती आणि तो गुन्हा नाही.
 
आयुक्तांनी अटकेचे आदेश दिले
या प्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्तांनी सांगितले की ही गंभीर बाब आहे.केंद्रीय मंत्र्याविरुद्ध दंडात्मक कारवाई साठी येथून एक पथक पाठवण्यात आले आहे.ते जिथे असतील तिथे त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करू.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

गावावरून परतल्यानंतर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार एकनाथ शिंदे, आज घेणार मोठा निर्णय

कॅन्सरचे ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात राहिली कात्री, 2 वर्षानंतर उघडकीस आले

LIVE: काँग्रेस नेते भाई जगतापच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा हल्लाबोल

भाई जगतापविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार, असा अपमान सहन करणार नाही म्हणाले किरीट सोमय्या

पुढील लेख
Show comments