suvichar

शिवसेनेच्या नेत्यांला लाज वाटली पाहिजे : देवेंद्र फडणवीस भडकले

Webdunia
बुधवार, 22 डिसेंबर 2021 (21:25 IST)
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांनी आज सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. तसंच भाजपचे सगळे आमदारही आक्रमक झाले.
भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांच्यासह सगळ्याच आमदारांनी केली.भास्कर जाधव यांनी दोनवेळा उठून उभं राहात मी कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही
त्यामुळे मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो असं सांगितलं. मात्र त्यांनी माफी मागितली नाही. ज्यामुळे विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहण्यास मिळाला. देशाच्या सर्वोच्च नेत्याची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना लाज वाटली पाहिजे
अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. एवढंच नाही तर भास्कर जाधव माफी मागा या घोषणाही सभागृहात मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्या.
यानंतर विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृह दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.
आज भास्कर जाधव बोलायला उभे राहिले त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांबाबत त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं. ज्यानंतर चांगलाच गदारोळ सभागृहात झालेला बघायला मिळाला. उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदींनी दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाचं काय झालं
असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहात असलेले भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे अशी एकमुखी मागणी भाजपतर्फे करण्यात आली.
माफी मागा माफी मागा अशा घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्यांची माफी मागितलीच पाहिजे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात चुकीचं वक्तव्य आणि अंगविक्षेप कधीही सहन केला जाणार नाही.
यानंतर भास्कर जाधव पुन्हा सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले काला धन लाना हैं की नहीं लाना हैं? अशी ती नक्कल होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल भास्कर जाधव यांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांना लाज वाटली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

वाढत्या इंधन दरांमुळे इंडिगो आणि एअर इंडियाने जून-जुलै महिन्यासाठीच्या देशांतर्गत विमानसेवा कमी केल्या

14 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 3 मृत्यू

LIVE: सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याचे प्रसिद्ध सरसबाग आणि गणपती मंदिर दोन दिवस बंद

'महायुती'तील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींची घेतली भेट, जाणून घ्या काय झाली चर्चा

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा शोकांतिक शेवट; प्रियकराच्या आत्महत्येनंतर महिलेनेही संपवले जीवन

पुढील लेख
Show comments