Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवनेरी, अश्वमेध च्या तिकीटात कपात

Shivneri
Webdunia
बुधवार, 3 जुलै 2019 (17:00 IST)
मुंबई-पुणे मार्गावर धावणारी शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत भरगोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून, म्हणजे ८ जुलै पासून लागू होणार आहेत. 
 
गेली १५ वर्षे  मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची "शिवनेरी" ही बस सेवा प्रवाशांच्या सुविधेसाठी सज्ज आहे.  या मार्गावर किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी सेवा म्हणून शिवनेरी बसकडे पाहिलं जातं. सध्या महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही प्रतिष्ठीत सेवा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

NIA ने सुरू केला पहलगाम हल्ल्याचा तपास

पाकिस्तानात झेलम नदीला भयंकर पूर,आणीबाणी जाहीर

राजाचे कर्तव्य म्हणजे प्रजेचे रक्षण करणे आणि अत्याचारींना मारणे, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

नागपुरात चाकूच्या धाकावर डॉक्टरला लुटले, एकाला अटक

राज्यात पाकिस्तानी नागरिक संशयास्पद किंवा अनोळखी असल्याच्या वृत्तांला देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावले

पुढील लेख
Show comments