Festival Posters

शिवसेनेना सरकारच्या बाजूने मतदान करणार

Webdunia
गुरूवार, 19 जुलै 2018 (16:16 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे. यावेळी अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून, सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप आपल्या खासदारांना बजावला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावापूर्वीच मोदी सरकारचे पारडे जड झाले आहे.
 
केंद्र आणि राज्यात सत्तेत असूनही गेल्या काही काळापासून सातत्याने भाजपाविरोधात भूमिका घेणारी शिवसेना अविश्वास प्रस्तावाबाबत काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिवसेना या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करेल किंवा या प्रस्तावावर बहिष्कार टाकेल अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिवसेना नेतृत्वाने अविश्वास प्रस्तावाबाबत भूमिका स्पष्ट करताना केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यासंदर्भातील व्हीप सेनेच्या लोकसभेतील खासदारांना बजावण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

रोहित शर्माचे धमाकेदार पुनरागमन; ७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक

तैवानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप

२० वर्षांनंतर 'ठाकरे बंधू' पुन्हा एकत्र, उद्धव-राज यांची ऐतिहासिक हातमिळवणी; विरोधकांचे धाबे दणाणले

LIVE: मनसे आणि शिवसेना-यूबीटी युतीची औपचारिक घोषणा

परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर तुमच्या नियंत्रणात काहीही राहणार नाही....मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसी आणि एमपीसीबीला फटकारले

पुढील लेख
Show comments