Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक ! कंबरेतून घुसलेली लोखंडी सळई पायातून बाहेर

Webdunia
सोमवार, 15 जानेवारी 2024 (12:55 IST)
ठाण्याच्या वर्तक नगर परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका परिसरात बांधकाम सुरु असताना इमारतीवर लावल्या जाणाऱ्या लोखंडी सळईवर एक तरुण जोरात पडला आणि सळई त्याच्या कंबरेतून  घुसून उजव्या पायाच्या जांघेतून बाहेर निघाली. एवढेच नाही तर हा तरुण शुद्धीवर होता. त्याला तातडीनं उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

वृत्तानुसार, रविवारी रौनक रेसिडेंसीच्या निर्माणाधीन बांधकाम वर राहणाऱ्या सुरक्षा रक्षकाला एका तरुण लोखंडच्या सळईवर पडलेला दिसला. हा तरुण बांधकामावर कामाला नाही. हा तरुण इमारतीवरून थेट खाली बांधकामाच्या साच्यासाठी लावलेल्या लोखंडी सळईवर पडलेला दिसला.

त्याच्या कंबरेतून मिळाली घुसून थेट उजव्या पायाच्या जांघेतून निघाली होती. हा तरुण नेमका तिथे कसा आला आणि तो वरून कसा काय पडला  हे प्रश्न उद्भवत आहे. सुरक्षा रक्षकाने इतर कामगारांना बोलवून घेतले. त्या कामगारांनी त्या तरुणाच्या आतील सळईला मुख्य संचापासून वेगळे केले आणि तरुणाला रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलिसांना कळविले. हा तरुण तिथे कसा काय पोहोचला याचा तपास पोलीस लावत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments