Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक! मेरठ मध्ये भाजप नेत्याला 5 वेळा कोरोनाची लस दिली गेली,काय आहे प्रकरण जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (14:00 IST)
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला आहे.तरी ही काही काही राज्यात कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढत आहे. केंद्र सरकारने कोरोनाप्रतीबंधात्मक लसी घेण्याचे सांगितले आहे.अद्याप लसीकरण सुरु आहे.पण सध्या उत्तरप्रदेशात कोरोना लसीकरणाबाबत निष्काळजीपणाची प्रकरणे समोर येत आहे.अलीकडे इथे ताजे प्रकरण मेरठ जिल्ह्यातील सरधना परिसरातील आहे.येथे भाजपच्या एका वृद्ध नेत्याला कोरोनाच्या पाच लस देण्यात आल्या. 
धक्कादायक बाब म्हणजे सहाव्या डोसचे अपाईनमेंट देखील आरोग्य विभागाने दिले होते. प्रमाणपत्र काढल्यावर हा निष्काळजीपणा समोर आला. भाजप नेत्याच्या तक्रारीवरून आरोग्य विभाग या प्रकरणाच्या तपासात लागले आहे.
 
येथील जिल्हा मुख्यालयात मिळालेल्या माहितीनुसार, सरधना नगरमधील इकडी रोड मोहल्ला धर्मपुरी येथील रहिवासी रामपाल सिंह (73), जे स्वतः भाजपचे बूथ अध्यक्ष आहेत, यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन्ही लस घेतल्या आहेत. परंतु आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाची परिसीमा अशी आहे की, त्यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात तीन वेळा पाच डोस दाखवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर सहाव्या डोसची संभाव्य तारीख देखील दिली गेली आहे. त्यांनी आरोग्य विभागावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
 
रामपाल सिंह यांच्या मते, ते हिंदू युवा वाहिनीमध्ये शहर समन्वयक सोबत, भाजप शहराचे 79 बूथ अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले की 16 मार्च रोजी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी पहिली लस दिली गेली आणि 8 मे रोजी दुसरी लस दिली गेली. यानंतर, त्यांना प्रमाणपत्राची गरज भासल्यावर त्यांनी CHC शी संपर्क साधला. भाजप नेते म्हणाले की, हे प्रमाणपत्र नेटवर उपलब्ध नाही. काही दिवसांनी, आरोग्य विभागाच्या मागणीनुसार,त्यांनी पुन्हा आयडी दिला. महिनाभर ते प्रमाणपत्रासाठी भटकत होते.
 
यानंतर, त्यांनी आपले ऑफलाइन लसीकरण कार्ड घेऊन संगणक केंद्र गाठले आणि कोरोना लसीकरणाच्या पोर्टलवरून त्याचे ऑनलाइन प्रमाणपत्र तपासले. येथे त्यांना कळले की त्याला दोनदा नव्हे तर पाच वेळा लसीकरण देण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच, 8 डिसेंबर ते जानेवारी 2022 दरम्यान सहावा डोस लावण्याची  तारीख देण्यात आली आहे. त्यांच्या पहिला डोस 16 मार्च रोजी, दुसरा डोस 8 मे रोजी, तिसरा डोस 15 मे रोजी दर्शविला गेला आहे. चौथा आणि पाचवा डोस 15 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी दर्शविला आहे.
 
रामपाल देखील तीन प्रमाणपत्रे पाहून आश्चर्यचकित झाले आहे. त्याचवेळी, सीएमओ  यांनी या घटनेला कोणाचा खोडकरपणा असल्याचे सांगितले आहे. माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार सीएमओ म्हणाले की ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. ते म्हणाले की, प्रथमदर्शनी हे एखाद्याचे षडयंत्र असण्याची शक्यता आहे.आरोग्य विभागाची साइट एखाद्याने हॅक केल्याचे दिसते. सीएमओ यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून अहवाल मागवण्यात आला आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

'वन नेशन वन इलेक्शन'पूर्वी महाराष्ट्रात एक राज्य, एक निवडणूक,वर फडणवीसांचा शिक्का!

LIVE: महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे प्रवेशपत्र जारी

MSBSHSE ने इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे प्रवेशपत्र जारी केले

प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये लागली भीषण आग

आसाममध्ये 10 महिन्यांच्या बाळाला एचएमपी विषाणूची लागण

पुढील लेख
Show comments