Dharma Sangrah

...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला होता

Webdunia
गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (11:39 IST)
शरद पवार यांनी भाजपवर डाव उलटवला अशी चर्चा असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मौन सोडले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते असल्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, असे शहा यांनी सांगितले. 
 
निवडणूक निकालानंतर राज्यात तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा मंगळवारी शेवट झाला. भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेणार्‍या अजित पवार यांनी माघार घेऊन राजीनामा
दिल्यामुळे भाजपचे सरकार अवघ्या 80 तासांत कोसळले. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आज (गुरूवारी) शपथ घेणार आहेत. 
 
अचानक फिरलेल्या राजकारणावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी तूर्त काही बोलण्यास नकार दिला. योग्यवेळी योग्य ते बोलेन, असे ते म्हणाले. मात्र, अमित शहा यांनी भाष्य केले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते. सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता.
 
भाजपला पाठिंबा देताना राज्यपालांनी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने सुरुवातीला जेव्हा सरकार बनविण्यास असर्थता व्यक्त केली होती. तेव्हा राज्यपालांना दिलेल्या पत्रावर अजित पवार यांचीच सही होती. आमच्या समर्थनासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रावरदेखील त्यांची सही होती. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, असे ते म्हणाले. अजित पवारांवरआरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
दरम्यान, फडणवीस यांची गणिते चुकल्याने पक्षातील त्यांच्या विरोधकांनी उचल खाल्ली आहे. पक्षात
पद्धतशीरपणे साइडलाइन केले गेलेले व निवडणुकीत तिकीटही नाकारले गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर टीकेची तोफ डागली आहे. त्यामुळे फडणवीस यांना पुढे अडचणींना तोंड द्यावे  लागण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

७ वर्षांनंतर इराणचे तेल भारतात येत आहे: ६ लाख बॅरल्सची पहिली खेप गुजरातमधील वादिनार येथे दाखल होणार, ट्रम्प यांच्या 'विशेष सवलती'चा परिणाम

उन्हाळी सुट्ट्यांबाबत सरकारी आदेश जारी: 'सुट्ट्या' २ मे पासून सुरू पण विदर्भात १ जुलैची मागणी का?

पुढील ५ दिवस हवामान बिघडण्याचा इशारा; मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा धोका; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra IAS Transfer महाराष्ट्रात मोठा IAS बदल; प्रशासनात मोठी फेरबदल

LIVE: राज्यात रेडी रेकनर दरांमध्ये वाढ होणार नाही

पुढील लेख
Show comments