Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

....म्हणून शरद पवारांनी दगडूशेठ हलवाई मंदिरात जाणं टाळलं"; कार्यकर्त्यांची माहिती

Webdunia
शुक्रवार, 27 मे 2022 (21:34 IST)
शरद पवार दर्शन न घेताच निघून गेल्याने चर्चांना उधाण
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवारांनी पुण्यातील भिडे वाडा आणि दगडुशेठ हलवाई मंदिर परिसरात भेट दिली. शरद पवार मंदिरात जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र शरद पवारांनी भिडे वाड्याची पाहणी केली आणि दगडुशेठ हलवाई मंदिरात  न जाताच पुढे प्रस्थान केलं. त्यामुळे शरद पवार मंदिरात का गेले नाहीत असा सवाल निर्माण होतोय.
 
शरद पवार मंदिरात का गेले नाहीत असा सवाल केला असता, राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, शरद पवार यांना मंदिरात जाण्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, मी आज मांसाहारी जेवण केलेलं आहे. त्यामुळे मंदिरात जाणं योग्य असणार नाही. त्यामुळे शरद पवार हे गाभाऱ्यात न जाताच निघाले. दरम्यान, यावेळी त्यांनी मुखदर्शन घेतल्याचं समजतंय. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका स्विकारल्यापासून त्यांच्या निशाण्यावर शरद पवार होते. शरद पवार हे नास्तिक असून, त्यांचा मंदिरातील किंवा दर्शन घेतानाचा फोटो किंवा व्हिडिओ क्वचितच आढळेल असं राज ठाकरे म्हणाले होते.
 
राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना शरद पवारांनी देवदर्शन हा प्रदर्शन करण्याचा विषय नाही असं म्हटलं होतं. तसंच यावरुन राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि बारामतीमधील पवार समर्थकांनी काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले होते. ज्यामध्ये शरद पवार स्वत: आरती करताना दिसत होते. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार आज मंदिरात जाणार का? असा सवाल निर्माण झाला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीसांनी केली एकनाथ शिंदेंवर काळी जादू! संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला

LIVE: 24 तासांत देशात नियम बदलले”, संजय राऊत म्हणाले

24 तासांत देशात नियम बदलले”, संजय राऊत म्हणाले

ब्राझीलमध्ये घराच्या चिमणीला विमान धडकले,10 जणांचा मृत्यू

ठाण्यात बेकायदेशीर वास्तव्यासाठी 1 महिलेसह 8 बांग्लादेशींना अटक

पुढील लेख
Show comments