Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुणीतरी माझा पाठलाग करतंय, शीतल म्हात्रें

Webdunia
बुधवार, 15 मार्च 2023 (07:53 IST)
शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी राज्यात वादंग निर्माण झाले असताना आता मुंबईत दादर येथे म्हात्रे यांच्यासोबत आणखी एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. दोन अनोळखी व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी दादर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पोलिसांनी याची तातडीनं दखल घेत दोन अनोळखी व्यक्तींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे.
 
शीतल म्हात्रे सोमवारी त्यांच्या मातोश्रींची भेट घेण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आल्या होत्या. आईला भेटून दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान बाळासाहेब भवन, चर्चगेट मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्या. यावेळी बाईकवरुन दोन जण आपला पाठलाग करत असल्याचं म्हात्रे यांना निदर्शनास आलं. "माझ्या सोबत चालक विशाल जाधव तसेच सुरक्षेसाठी नेमणूकीस असलेले पोलीस महाले हे देखील वाहनात होते. मी वाहनाच्या मधील सिटवर डाव्या बाजूला बसले होते. आमची कार शिवाजी पार्क येथून वीर सावरकर मार्गाने मुंबईच्या दिशेने पुढे जात होती. पुढे  इंदुमील जंक्शन येथून किर्ती कॉलेज जंक्शन या ठिकाणी येत असतांना आमच्या वाहनांचा दुचाकीवरून दोन जण पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आले", असं शीतल म्हात्रे यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.  
 
"दुचाकीवरील व्यक्ती, माझ्या कारजवळ येऊन माझ्याकडे वारंवार टक लावून पाहत असल्याचं मी पाहिलं. तसंच सदर स्कुटरवरील दोन इसमांपैकी मागे बसलेला इसम हा माझ्या दिशेनं हातवारे करत असताना मला दिसलं. मला ते दोन्ही इसम माझ्यावर हल्ला करण्याची भिती वाटल्याने वाहन चालकास गाडीचा वेग वाढविण्यास सांगितला. त्याप्रमाणे आमचे वाहन वेगाने पुढे निघून गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे", असंही शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात 'ई-फायलिंग' प्रणाली सुरू

पुण्यात 'ई-फायलिंग' प्रणाली सुरू,वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे 3,560 गुन्हे दाखल

दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी होणार नाही, द्वारका एक्सप्रेसवेवर बोगदा तयार नितीन गडकरींनी दिली माहिती

वक्फ सुधारणा कायद्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालय 15 एप्रिल रोजी याचिकांवर सुनावणी करू शकते

वर्ध्यात भाजपच्या माजी खासदाराला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

पुढील लेख
Show comments