Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेशी केले असे काही

Webdunia
मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (08:48 IST)
सासरच्या लोकांकडून विवाहितांच्या छळ होण्याच्या अनेक घटना समोर येतात. त्यात अनेक मुलींना त्यांचं आयुष्य देखील गमवावं लागतं. असाच एक विचित्र प्रकार बारामती तालुक्यात घडला. हुंड्यासाठी  विवाहितेचे दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून जीवे ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
या घटनेवरुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
 
सुरेखा भाऊसाहेब गडदरे अस मयत महिलेचे नाव आहे. लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, असा आरोप आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली .
 
हुंड्यासाठी इतक्या क्रूरपणे सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मृत मुलीच्या कुटुंबाची मागणी आहे.

Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

LIVE: अमित शहांचा बचाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले अमित शहांच्या बचावासाठी, म्हणाले ते हे करू शकत नाहीत

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात, तीन ठार, तीन गंभीर जखमी

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

ठाण्यात 12 वर्षीय मुलीचा स्मशानभूमीच्या भिंतीजवळ आढळला मृतदेह, आरोपीला अटक

पुढील लेख
Show comments