Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्यवसायात भागीदारी आमिष दाखवून कॉन्ट्रॅक्टर बापलेकांन केली वृद्धाची दीड कोटींची फसवणूक

Webdunia
रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (10:27 IST)
नाशिकरोड  : व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून त्यापोटी स्वीकारलेली सुमारे 1 कोटी 59 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर बापलेकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शंकर झुंबरराव धनवटे (वय 85, रा. कलानगर, जेलरोड, नाशिकरोड) व आरोपी मिलिंद आनंद बच्छाव (वय 52) व हर्षल मिलिंद बच्छाव (वय 32, दोघेही रा. किशन सोसायटी, सायखेडा रोड, नाशिकरोड) हे एकमेकांच्या ओळखीचे असून, एकमेकांचे मित्र आहेत.

मिलिंद बच्छाव हे सूरज इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर हर्षल बच्छाव हा कॉन्ट्रॅक्टर आहे. दरम्यान, आरोपी बच्छाव बापलेकाने सन 2016 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत फिर्यादी शंकर धनवटे यांना भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असल्याने आरोपी बच्छाव यांनी धनवटे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भागीदारीतील व्यवसायासाठी बच्छाव बापलेकाने धनवटे यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम, तसेच आरटीजीएसद्वारे काही रक्कम अशी एकूण 1 कोटी 59 लाख 16 हजार 550 रुपयांची रक्कम स्वीकारली.
 
ही रक्कम घेऊन त्याद्वारे होणाऱ्या व्यवसायातून व्यावसायिक वाहने खरेदी केली व सरकारी ठेके मिळवून त्यासाठी फिर्यादी धनवटे यांनी दिलेल्या पैशांचा वापर केला. त्याचप्रमाणे साक्षीदार संजय एस. निमगुलकर व आरोपी मिलिंद बच्छाव यांनी सन 2012 मध्ये बांधकामाचा व्यवसाय करण्याचे ठरवून तो व्यवसाय सुरू केला. या कालावधीत त्यांनी रस्त्यांची बांधकामे केली. साधारण 2016 ते 2017 च्या सुमारास फिर्यादी धनवटे व निमगुलकर यांची भेट झाली. ते दोघेही वर्गमित्र असून, त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
 
त्यानंतर धनवटे यांना निमगुलकर याने आरोपी मिलिंद बच्छाव यांच्यासोबत बांधकामाचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची ओळख बच्छाव यांच्याशी करून दिली. त्यानंतर तिघांनी मिळून बांधकाम व्यवसाय भागीदारीत करण्याचा प्रस्ताव एकमेकांसमोर ठेवला. त्यास तिघांची अनुमती मिळाली.
 
त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी सुमारे 1 कोटी 59 लाख 16 हजार 500 रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांतून त्यांना दिली. आरोपी बच्छाव यांनी या रकमेचा वापर करून फिर्यादी धनवटे यांच्यासोबतचे भागीदारी संबंध एकतर्फी नाकारून त्यांनी दिलेल्या पैशांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून फसवणूक केली.

हा प्रकार किशन सोसायटी, सायखेडा रोड व द्वारका येथील निवृत्ती कॉम्प्लेक्स येथे घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मिलिंद बच्छाव व हर्षद बच्छाव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी स्मृती मंदिराला भेट दिली

मुंबई बोट दुर्घटनेनंतर प्रशासन कडक, आजपासून लागू होणार हे नियम

LIVE: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी नागपुरात स्मृती मंदिराला भेट दिली

मोठी बातमी : Cancer Vaccine कर्करोगाचा सामना करण्यासाठी लस तयार, कोणाला मोफत मिळणार जाणून घ्या

हनीमूनला काश्मीरला नाही तर मक्का जा, जावई राजी न झाल्याने सासऱ्याने ॲसिड हल्ला केला

पुढील लेख
Show comments