Dharma Sangrah

एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, आजपासून आंदोलन तीव्र

Webdunia
गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (10:46 IST)
राज्यात अनेक मागण्यांसाठी बुधवारपासून एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांनी बेमुदत उपोषण राज्यभरात सुरू केले आहे. यापुढेही उपोषण सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी बोलताना स्पष्ट केले.
 
राज्य मार्ग परिवहन मंडळाची बिघडलेली आर्थिक घडी, तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे अनिश्चित वेतन, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, प्रलंबित महागाई भत्ता अशा अनेक मागण्यांसाठी परिवहन मंत्र्यासोबत पार पडलेल्या बैठकीतही कोणताही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे.
 
बुधवार सकाळपासूनच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या दिवाळीपूर्वी मान्य व्हाव्यात, यासाठी एसटीच्या विविध कामगार संघटनांनी एकजूट दर्शवते बेमुदत उपोषण सुरू केले. गेल्या मागील दीड वर्षापासून एसटीचा आर्थिक डोलारा पूर्णतः ढासळला असून प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यात डिझेलच्या किमती वाढल्याने एसटी बसचा दैनंदिन खर्च भागवणेही कठीण होत चालले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मागील वर्षभरापासून राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. 
 
बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक, महाराष्ट्र एसटी कामगार सेना व कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. डिझेलच्या वाढलेल्या किमती, तसेच राज्य शासनाकडून मिळणारी तुटपुजी मदत, त्यात दिवाळीनंतर मार्ग काढू असे म्हणून सद्यस्थिती आणखी विदारक होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात एसटी सेवा बंद होऊन वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, असेही तिगोटे यांनी यावेळेस स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाकरे बंधूंचे आव्हान: मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षड्यंत्र

१० मुलींनंतर मुलगा झाला... १९ वर्षांत ११ व्यांदा आई बनली

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन

ट्रम्प भारतावर ५०० टक्के कर लादणार! रशियाचे तेल चीन आणि ब्राझीललाही महागात पडेल

IND vs NZ T20: नागपूरमध्ये सामन्याच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो धावेल; एसटी बसेस देखील उपलब्ध असतील

पुढील लेख
Show comments