Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्यार्थी पाय घसरुन तब्बल दीड हजार फूट दरीत कोसळला; सुरगाण्यातील साखळचोंड धबधब्यात दुर्घटना

Webdunia
गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (15:16 IST)
नाशिक – सहलीसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.  सुरगाणा तालुक्यातील साखळचोंड धबधब्याच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. हा विद्यार्थी दीड हजार फूट दरीत कोसळला.  तक्षिल संजाभाई प्रजापती असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा गुजरात राज्यातील आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा तातापाणी येथे साखळचोंड धबधबा आहे. या धबधब्याच्या ठिकाणी सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजचे काही विद्यार्थी सहलीसाठी आले होते. तक्षिल हा इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तक्षिलसह त्याचे १० ते १२ मित्र पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे आले होते. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील शॉवर पॉईंट धबधब्यावर अंघोळ करत होते. खडकावर शेवाळ असल्याने तक्षिलचा पाय घसरला. त्यामुळे तो दीड हजार फूट खोल दरीत कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दीड हजार फूट खोल दरीतून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. यासाठी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह रस्त्यावर आणण्यात येऊन पाच वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यासाठी पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 26 वी अटक, शूटर्सना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणाऱ्याला अकोल्यातून अटक

महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, दहावीचा पेपर 21 फेब्रुवारीपासून तर बारावीचा पेपर 11 फेब्रुवारीपासून होणार

भाजप जिंकल्यास फडणवीस मुख्यमंत्री होणार ! या बैठकीनंतर गोंधळ वाढला

'महाराष्ट्रात एमव्हीए बहुमताने जिंकेल', निवडणूक निकालापूर्वी रमेश चेन्निथला यांचा दावा, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हे बोलले

पुढील लेख
Show comments