Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विदर्भ : उमरखेड तालूका पक्षी म्हणून “सुगरण”पक्ष्याची निवड

Webdunia
सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (09:12 IST)
उमरखेड तालूक्यातील जनतेला पक्षी जीवनाची ओळख व्हावी, पक्ष्यांबद्दल ओढ लागावी,तालूक्याची पक्षीप्रेमी व पर्यावरण स्नेही तालूका अशी ओळख व्हावी या उद्देशाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेड द्वारा घेण्यात आलेल्या तालूका पक्ष्याच्या आगळया वेगळ्या निवडणूकीचा निकाल नुकताच लागला आहे. सिने अभिनेते श्री जयराज नायर यांच्या हस्ते निकाल  जाहिर करण्यात आला असून उमरखेड तालूका पक्षी म्हणून “सुगरण”या पक्ष्याची निवड करण्यात आली.
 
सुगरण पक्षाला ऑनलाईन ४२ व बॅलेट पेपरद्वारे २०७२ असे एकुण २११४ मत पडले. या निवडणूकीत ऑनलाईन द्वारे १८८ तर बॅलेट पेपर द्वारे १०१९२ असे एकुण १o३८o मतदान झाले. दुसऱ्या क्रमांकावर पोपट व तिसऱ्या क्रमांकावर बुलबुल पक्षाला मतदान पडले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय सचिव श्री दिपक काळे, पुर्व महाराष्ट्र अध्यक्ष दिपक ठाकरे, ठाणेदार हनुमंतराव गायकवाड, डॉ. विश्वनाथ विणकरे, जेष्ठ पत्रकार मझहर टेलर, संतोष माने सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 
कार्यक्रमाच्या सुरवातीला दिवंगत माजी पंतप्रधान  अटलबिहारी वाजपेयी व पर्व क्रिकेटर अजित वाडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रात तिसऱ्या व विदर्भात दुसऱ्या झालेल्या या निवडणूकी करीता उमरखेड तालूक्यात आढळणारे वेडा राघु, पोपट, काळा कंकर, घनचिडी, बुलबुल, सुगरण, जांभळा सुर्यपक्षी, खंडया, तांबट, कोतवाल असे दहा पक्षी उमेदवार म्हणून उभे करण्यात आले होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उमरखेड, ढाणकी, विडूळ, चातारी, बिटरगाव, ब्राम्हणगाव, मुळावा, पोफाळी, कुपटी, मरसुळ अशा अनेक गावातील शाळा, कॉलेज, शेत शिवार, सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन आवडत्या पक्षाला मतदान करून घेतले. या मतदान प्रकियेत चांगला प्रतिसाद मिळाला.
 
यावेळी सर्पमित्र माधवराव चौधरी, चित्रपट दिग्दर्शक आनंद शिंदे, पत्रकार चंद्रे मॅडम, अविनाश मुन्नरवार, औदुंबर वृक्ष संवर्धन समिती यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी व पक्षीप्रेमी नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव तथा व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांनी केले तर आभार पुर्व महाराष्ट्र अध्यक्ष दिपक ठाकरे यांनी मानले.
 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पुर्व महाराष्ट्र अध्यक्ष दिपक ठाकरे, तालूका अध्यक्ष गजानन चौधरी, उपाध्यक्ष जमिर खतीब, सचिव प्रभाकर दिघेवार, सहसचिव फराहत मिर्झा, माधव चौधरी, प्रमोद वाळूककर ,शे.शफी, इब्राहीम सौदागर इत्यादी कार्यकर्त्यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले पत्र

वाशीत सहा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूचे कारण बनली कारची एअर बॅग

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॅनर-होर्डिंग्ज बाबत लिहले पत्र

पुण्यामध्ये अपघातानंतर तरुण बेशुद्ध, पोलीस अधिकारींनी वाचवले प्राण

महाराष्ट्रात 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुढील लेख
Show comments