Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुहास कांदे यांनी थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर व्यक्त केली नाराजी

Webdunia
शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (20:53 IST)
नाशिकमध्ये आमदार सुहास कांदे यांनी थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याने त्यांची खदखद समोर आली आहे. बैठकींना बोलवले जात नाही, पक्षाच्या नियुक्त्या परस्पर केल्या जातात’ अश्या पद्धतीची भावना कांदे यांनी व्यक्त केल्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
 
 
‘मरेपर्यंत एकनाथराव संभाजी शिंदे’ या व्यक्तिसोबतच राहणार असे सांगतानाच आमदार कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. याआधी पालकमंत्री राहिलेले गिरीश महाजन, छगन भुजबळ यांनी नेहमी आपल्या पक्षाच्या आमदारांना सोबत घेऊनच जिल्ह्यातील कुठल्याही बैठका केल्याचा इतिहास आहे. परंतु, मला कुठल्याही बैठकीला आमंत्रितच केल जात नाही किंवा कळवलेही जात नाही त्यामुळे पालकमंत्र्यांच्या बैठकीला जाणे योग्य नाही म्हणून मी जात नाही’ असे म्हणत कांदे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे. नगरविकास मंत्री किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे तर एक व्यक्ति म्हणून माझ त्यांच्यावर प्रेम आहे. आणि त्या प्रेमाखातर मला मान अपमान सहन करावा लागेल, त्यासाठी मला दोन पाऊल मागे याव लागेल, त्यांच्यासाठी एमएलए काही त्याग करावा लागेल तरी माझी तयारी आहे. त्यांच्यावरील प्रेमापोटी हे सगळं सहन करण्याची तयारी ठेवतो. आणि माझ त्याच्यावरील हे प्रेम मरेपर्यंत टिकून राहील, असेही कांदे यावेळी म्हणाले. कांदे यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकरणात खळबळ उडाली आहे. याआधी छगन भूजबळ पालकमंत्री असतानाही कांदे यांनी निधि वाटपावरून थेट भुजबळांना अंगावर घेतलं होत.

Edited by - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

जालना येथे भीषण अपघात, कार उभ्या ट्रकला धडकली, कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर 11 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, गडचिरोली जिल्ह्याला वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही भेट

मंत्र्यांना या बंगल्यात राहण्याची भीती वाटते, बंगला कोणाला मिळेल? समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण

पुण्यातील भीमा कोरेगाव येथे आज युद्धाचा 207 वा वर्धापन दिन साजरा होतोय

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाची सुरुवात 'रक्तदान - श्रेष्ठदान'ने केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या

पुढील लेख
Show comments