Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोलीस अधिक्षकांची धडक कारवाई मालेगावला बायोडिझेल पंपावर छापा तर पेठला अडोतीस लाखाचा गुटखा जप्त

Webdunia
बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (08:19 IST)
राजकीय अथवा धनदांडग्यांच्या दबावाला न जुमानता जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेला सुरूंग लावणाऱ्या कुणावरही कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्यास ग्रामिण पोलीस सक्षम आहेत,असा संदेश पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी आणखी एका मोठ्या कारवाईतून अवैध प्रवृत्तींना दिला आहे.विशेष म्हणजे सोमवार दि.१६ आॕगस्ट रोजी जिल्हा हद्दीत पन्नास लाखाहून अधिक किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करून मालेगावमध्ये अनाधिकृतपणे बायोडिझेल पंप चालविणाऱ्या माजी आमदाराच्या भावाच्या मुसक्या बांधल्याने जिल्हा पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे. हुक्का पार्लर,रेव्ह पार्टीचे संचालकांवर कारवाई करतांना या परिघात कथित प्रतिष्ठेचे प्रदर्शन मांडणारे धनदांडगे,राजकीय सामाजिक क्षेत्रातील तथाकथीत प्रतिष्ठेचा बुरखा फाडीत दिवट्या पुत्रांवरही कारवाई करण्याचे धाडस दाखवले.कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अशा अवैध व्यवसायांवर कायद्याचा आसूड ओढण्याची मोहीम सुरूच असून या मोहीमेअंतर्गत सोमवारीही दोन मोठ्या कारवाया केल्या.
 
मालेगाव येथील माजी आमदाराच्या भावाने उभा केलेला बायोडिझेल पंपाचा अनाधिकृत व्यवसाय या कारवाईत उध्वस्त करण्याचे धाडस पोलीस अधिक्षकांनी दाखवले.हाॕटेलच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या अनेक दिवसापासून हा पंप बेकायदेशीरपणे सुरू होता.तथापी माजी आमदार कुटूंबाची मनी आणि मसल्स पाॕवरच्या जोरावर असलेली दहशत या पंपाला संरक्षण देत असल्याने इत्यंभूत माहीती असूनही स्थानिक पोलीस कारवाई करण्यास असमर्थ ठरत होते.ही बाब निदर्शनास येताच या पंपावर स्वतः पोलीस अधिक्षकांनी छापा टाकून २५ हजार लिटर बायोडिझल भरलेली टाकी तसेच बायोडिझेल तयार करण्यासाठी वापरले जाणाऱ्या रसायनाच्या पाच हजार लिटरच्या तीन टाक्या जप्त करून संबंधीतांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
दरम्यान पेठ पोलीसांनीही सोमवारी केलेल्या मोठ्या कारवाईत ३८ लाख १९ हजार २०० रू.एव्हढ्या किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.एम एच १६ सीसी २८४२ या चार चाकी वाहनाचा संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता साड्यांच्या गाठींमध्ये खोटी बिले तयार करून महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.अधिक चौकशी अंती केसर युक्त विमल पान मसाला, लेबल नसलेली सुगंधी तंबाखू असा एकूण ३८,१९,२०० रू किंमतीचा माल १२ लाखाच्या चार चाकीतून वाहून नेला जात असल्याचे निदर्शनास आहे.याप्रकरणी पोलीसांनी पाचारण केलेले अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांच्या फिर्यादीवरून सुभाष नारायण पालवे,देवराई ता.पाथर्डी,जि.अहमदनगर,शिवाजी रामू कराड एमआयडीसी अहमदनगर या दोघांसह वाहन मालक विनीत गिरिधारीलाल जग्गी अहमदनगर यांच्याविरूध्द भादवि १८८,२७२,२७३,४२०,३४,३२८,अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ चे कलम २६(२) कलम २७,कलम ३०(२)(अ)सह कलम२६(२)(i),(v),३(१)(zz)(i),२७(३)(e) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयीतांसाह १२ लाखाची कार तसेच ३८,१९, ४०० रू किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा असा एकूण ५०,१९,४०० रू.चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
 
पोलीस अधिक्षक म्हणून पदभार स्वीकारतांना सचिन पाटील यांनी नाशिक जिल्ह्याची सर्वच क्षेत्रात असलेली गौरवशाली परंपरा बाधीत होईल अशा कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला जिल्हा पोलीस यंत्रणा पाठीशी घालणार नाही,अशी ग्वाही दिली होती. ही ग्वाही त्यानंतर जिल्हाभर होत असलेल्या पोलीस कारवाईने वास्तवात उतरत आहे. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील अवैध धंदे आणि या धंद्यांशी संबंधीत राजकीय आणि समाजकारणातील प्रतिष्ठीत लागेबांधे,धनदांडग्यांचा दबाव झुगारून झालेल्या कारवाया पोलीस अधिक्षकांच्या कर्तव्य तत्परतेचा दाखला देत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

चिंचवड विधानसभेच्या जागेवर भाजप कडूनआमदार अश्विनी जगताप यांना उमेदवारी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी NIA कोर्टातून साध्वी प्रज्ञा ठाकूरला जामीन वॉरंट

शिवाजीनगर जागेवर भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर टीका

Bandipora : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

पुढील लेख
Show comments