Dharma Sangrah

'सधन' असतानाही शिष्यवृत्ती घेणे 'लाचारी' :सुशीलकुमार शिंदे

Webdunia
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (10:40 IST)

आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना आरक्षण मागणं ही लाचारी असे वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. नागपुरात ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

“काही लोक आधीच्या पिढीवर झालेल्या अन्यायाचं भांडवल करतात. हे थांबलं पाहिजे,” असं आवाहनही त्यांनी केलं.आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर, स्वत:हून आरक्षण सोडल्याची आठवणही त्यांनी सांगितली. 

ते म्हणाले की, “मी जेव्हा नोकरी करत होतो. त्यावेळी मी मागासवर्गीय प्रवर्गातील शिष्यवृत्ती घेतली. कारण, त्या काळात 60 रुपये पगारात दोन आयांना सांभाळणं शक्य नव्हतं. पण जेव्हा मी सधन झालो. मंत्री झालो. त्यावेळी माझ्या मुलीने हिच शिष्यवृत्ती न घेण्याचा निर्णय घेतला.”

“सधन असतानाही अशी शिष्यवृत्ती घेणं ही एकप्रकारची लाचारी आहे, असं मला वाटतं” असं परखड मत त्यांनी  मांडले.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

LIVE: आम्ही भाजपसोबत जिंकलो, आम्ही त्यांच्यासोबतच राहू… शिंदे गटाने स्पष्ट केले

नितीन नबीन भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्यास सज्ज

तरुण पिढीकडे नेतृत्व सोपवण्याबाबत नितीन गडकरी काय म्हणाले?

"बाबा, मला वाचवा, मला मरायचे नाही..." नोएडामधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने दोन तास जीव वाचवण्याची याचना केली; जबाबदार कोण?

सिंहगड रोडजवळील कालव्यात १२ वर्षीय मुलगा बुडाला

पुढील लेख
Show comments