Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बी.पी जगताप यांना निलंबित करण्याचे अध्यक्षांचे निर्देश

Webdunia
शुक्रवार, 20 जुलै 2018 (15:17 IST)
अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांनी जाणीवपूर्वक वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यास टाळाटाळ केली असल्याचा आरोप विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी मांडून केला. बारलावर या इसमाचे सख्खे भाऊ, चुलत भाऊ, काका, आतेभाऊ, मामेभाऊ व इतर नातेवाईक यांना वैधता प्रमाणपत्र दिले. याच आधारावर बरलावार यांनी जात वैधता प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र जगताप यांनी जाणीवपूर्वक विलंब केला गेला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
 
विविध शासकीय पदावर काम करत असताना जगताप यांनी सुप्रीम कोर्टाने रद्द केलेल्या उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र दिले. आंध्र, कर्नाटक, राज्यातील अनेक लोकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र दिले. यातून त्यांनी ५०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती जमवली असल्याची माहिती अजित पवार यांनी सभागृहाला दिली. या भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करण्याची व त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. यावर अध्यक्षांनी बी.पी.जगताप यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

गोव्यापासून भोपाळपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था, चर्च आणि बाजारपेठांमध्ये नाताळ उत्सवाचे वातावरण

LIVE: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडेल

मुंबईत पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण राहील, दिवसा तापमानात घट, रात्री तापमानाचा पारा वाढेल

पुढील लेख
Show comments