Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री म्हणाले देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस

Webdunia
शनिवार, 30 जुलै 2022 (14:53 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढली आहे. सत्ता स्थापनेपासून ते कॅबिनेटच्या बैठकीपर्यंत हि जोडी एकदम घट्ट बनून निर्णय घेत आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या परिणाम आता रोजच्या जीवनात दिसायला सुरवात झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  राज्याच्या दौऱ्यावर असून नाशिकमध्ये त्यांनी पोलीस वसाहतीचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांचे नरेंद्र मोदी यांचे नाव घेताना एकनाथ शिंदे यांच्या तोंडी चुकून देवेंद्र फडणवीस  यांचेच नाव आले. मात्र नंतर त्यांनी आपली चूक सुधारली. यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
 
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने गेल्या महिनाभरापासून दोघा मंत्र्यांची कॅबिनेट चालवत असल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.
 
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
पोलीस वसाहतीचे उद्घाटन माझ्या हस्ते होणार हा योग होता. पोलिस बांधव हे सण उत्सव, कोव्हिड, ऊन वारा पाऊस असतानाही जनतेच रक्षण करतात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस पार पाडत आहेत. मनुष्यबळ, यंत्रणा हे देण्याचे काम शासनाचे आहे. पोलिसांसमोर अनेक अडचणी आहेत. जुन्या वसाहती आहेत, लिकेज आहेत, प्लास्टर पडत आहेत. राज्यभरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. जुन्या वसाहतींमध्ये आमूलाग्र बदल घडविण्याची गरज आहे. पोलीस रस्त्यावर असताना घराची चिंता नसावी, तर ते अधिक कार्यक्षमताने काम करु शकतील असेही शिंदे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments