Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य मंत्री मंडळाने कोविड मुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी महत्वाचे निर्णय घेतले

Webdunia
बुधवार, 2 जून 2021 (20:56 IST)
राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.या निर्णयात कोविडमुळे आपल्या पालकांना गमावून बसलेल्या निराश्रित मुलांसाठी त्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहे. या मध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या नावी पाच लाख रुपये एक रकमी मुदत ठेवा ठेवून ते सक्षम होई पर्यंत त्यांचा बालसंगोपन योजनेतून सर्व खर्च उचलला जाईल.हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

या योजने अंतर्गत 1 मार्च 2020 व त्यानंतर कोरोनासंसर्गाने मरण पावलेले दोन्ही पालक किंवा दोघां पैकी एक किंवा इतर अन्य कारणामुळे मृत्युमुखी झाले असल्यास किंवा त्यापैकी एका पालकाचा मृत्यू 1 मार्च 2020 पूर्व किंवा मार्च 2020 नंतर एका पालकांचा मृत्यू होऊन अनाथ झालेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलांचा समावेश या योजनेअंतर्गत होणार आहे.  

आपल्या पालकांना गमाविल्यानंतर अनाथ झालेल्या मुलांच्या  भविष्याचा विचार करून त्यांना अर्थ साहाय्य देण्याची ही योजना आहे.केंद्र सरकारच्या पीएम केयर योजना देखील अशीच योजना आहे आणि ती राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट शासन देखील ही योजना राबविणार आहे. 

या योजनेअंतर्गत पाल्याला बालवसतिगृहामध्ये दाखल करून किंवा कोणी नातेवाईक असल्यास त्यांनी मुलाचे संगोपन केल्यास त्यांना महिला व बाल विकास विभागाच्या बाल संगोपन योजनेतून अनुदान देण्यात येईल.त्या मुलाचा नावाने पाच लाख रुपये एकरकमी ठेवण्यात येणार आहे. आणि त्याला ती रकम त्याने वयाचे 21 वर्ष पूर्ण केल्यावर व्याजासह देखील मिळणार आहे.

कोविडमुळे अनाथ झालेल्या आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित मुलांची कागदपत्रे कृतिदलासमोर सादर करून या योजनेचा लाभ त्या मुलाला मिळवून देण्याची जबाबदारी जिल्हा महिला अधिकारी आणि बालविकास अधिकाऱ्यांची राहील.योजनेच्या अटी आणि नियमांची सविस्तर माहिती देण्यात येईल. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाण्यात रुग्णालयात रुग्णाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्रात दारू विकत घेण्यासाठी वयाची अट किती ? आबकारी नियम माहित काय म्हणतात

3 पुर्‍या एकत्र खाल्ल्याने मृत्यू ! डाक्टर देखील हैराण

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर फेकला मोबाईल, चेहऱ्यावर जखमा

LIVE: संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा यावर भाष्य केले

पुढील लेख
Show comments